1200 कामगारांना घेऊन लॉकडाऊनमध्ये पहिली ट्रेन धावली…

नवी दिल्ली | लॉकडाऊनमुळे देशातील सर्व ट्रेनही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कामासाठी गेलेले कामगार तिथेच अडकून पडले आहे. अशातच शासनाने या कामगारांना आपापल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी परवानगी दिली आहे.

आज कामगारांना घेऊन जाण्यासाठी हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटिया येथे जाण्यासाठी एक विशेष गाडी सोडण्यात आली. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे.

सध्या ही अशा पद्धतीची एकमेव स्पेशल ट्रेन सोडण्यात आली आहे. पहाटे तेलंगणातून ही विशेष ट्रेन रवाना झाली. त्यात 24 डब्यांत 1200 मजूर होते अशीही माहिती रेल्वेनं दिली आहे. त्याआधी प्रत्येक प्रवाशांचं व्यवस्थित स्क्रीनिंग करण्यात आलं, सोशल डिस्टनसिंगच्या अटीही स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये पाळण्यात आल्याचं रेल्वेच्या वतीनं सांगितलं आहे.

तेलंगाणा सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हैदराबादमधून हटियासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे झारखंडमधील कामगार तेलंगाणामध्ये अडकले होते, त्यांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे यासाठी ही विशेष ट्रेन सोडण्यात आली. यावेळी काही रेल्वे अधिकारी आणि पोलीस अधिकारी लिंगपिल्ली स्थानकावर उपस्थित होते.

 

महत्वाच्या बातम्या-

-हो, मी पुरावे बघितलेत, वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाची उत्पत्ती- डोनाल्ड ट्रम्प

-“आता मुखपत्रातून नव्या जोमाने पंतप्रधानांचा शेलक्या भाषेत उल्लेख सुरु करा”

-चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समुद्रात घुसले!

-3 मे रोजी लॉकडाउन संपणार का?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

-कोरोनातून बरे झालेल्या नर्सचं ढोल ताशा लावून स्वागत; पिंपरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर गुन्हा दाखल