हो, मी पुरावे बघितलेत, वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाची उत्पत्ती- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन | वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या लॅबमधूनच कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. व्हाइट हाऊसमध्ये ते बोलत होते.

वुहानच्या लॅबमधून कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाल्याचे तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहात, तुम्ही पुरावे पाहिले आहेत का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. यावर हो, मी पुरावे पाहिले आहेत. पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकत नाही, असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबने त्यांच्यावर होत असलेले आरोप आधीच फेटाळून लावले आहेत. वुहानच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरसचे मूळ असून तिथून कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाली या आरोपात काहीही तथ्य नाहीय, असं लॅबच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी रॉयटर्सला सांगितलं होतं.

वुहानमधल्या मासळी बाजारातून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली. प्राण्यांमधून हा आजार माणसामध्ये आला असं काही तज्ज्ञांचं मत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आता मुखपत्रातून नव्या जोमाने पंतप्रधानांचा शेलक्या भाषेत उल्लेख सुरु करा”

-चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समुद्रात घुसले!

-3 मे रोजी लॉकडाउन संपणार का?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

-कोरोनातून बरे झालेल्या नर्सचं ढोल ताशा लावून स्वागत; पिंपरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर गुन्हा दाखल

-पुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार!