जनता हीच राज्य आणि देशाची संपत्ती, ती वाचली पाहिजे- उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

जनता ही राज्य आणि देशाची संपत्ती आहे. तीन मे नंतर लॉकडाऊनचं काय हा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अर्थचक्र रुतलं मान्य, पण तुम्ही सगळे नागरिक ही राज्याची संपत्ती आहे. जनता वाचली पाहिजे, तुम्ही सगळे सैनिक आहात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन आहेत, मुंबई आणि परिसर, पुणे आणि आसपासचा भाग, नागपूर, औरंगाबाद हे रेड झोन, ऑरेंजमध्ये काळजी, ग्रीनमध्ये अटी-शर्तींसह व्यवहारांना परवागनी दिली आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

मुंबई आणि शेजारचा परिसर, पुणे, नागपूर यासारख्या रेड झोनमध्ये काही करणं आता हिताचं नाही. ऑरेंज झोनमधली काही जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो याचा विचार सुरु आहे. ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-हो, मी पुरावे बघितलेत, वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाची उत्पत्ती- डोनाल्ड ट्रम्प

-“आता मुखपत्रातून नव्या जोमाने पंतप्रधानांचा शेलक्या भाषेत उल्लेख सुरु करा”

-चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समुद्रात घुसले!

-3 मे रोजी लॉकडाउन संपणार का?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट