“The Kashmir Files चित्रपट न पाहणाऱ्यांना 2 वर्ष जेलमध्ये टाका”

नवी दिल्ली |  देशात सध्या द काश्मीर फाईल्सवरून (The Kashmir Files) मोठा गोंधळ चालू आहे. नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये झालेल्या प्रमुख घडामोडींवर चित्रपट तयार करण्यात आला आहे.

निर्माते आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरच्या पंडितांच्या स्थितीवर चित्रपट तयार केला आहे. सध्या या चित्रपटावरून राजकारण पेटलं आहे.

काॅंग्रेस आणि भाजपमध्ये या चित्रपटावरून वाद पेटला असताना आता यामध्ये तृणमुल काॅंग्रेसनं देखील उडी घेतली आहे. परिणामी चर्चा होत आहे.

तृणमुल काॅंग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी चित्रपट न बघणाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे. सिन्हा यांनी सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

संसदेत कायदा संमत करून चित्रपट न बघणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद करण्याची मागणी केली आहे. परिणामी सिन्हांचं वक्तव्य चर्चेत आहे.

फक्त चित्रपट टॅक्स फ्री करून चालणार नाही तर प्रत्येक भारतीयासाठी हा चित्रपट पाहणं बंधनकारक केलं पाहीजे, असंही सिन्हा म्हणाले आहेत.

द काश्मीर फाईल्स चित्रपट न पाहणाऱ्यांना 2 वर्ष तुरूंगवास आणि चित्रपटावर टीका करणाऱ्यांना जन्मठेप देण्यात यावी, असं खळबळजनक वक्तव्य सिन्हांनी केलं आहे.

दरम्यान, सिन्हा यांच्या वक्तव्यानंतर आता तृणमुल काॅंग्रेसमध्ये विविध मतप्रवाह तयार होत आहेत. द काश्मीर फाईल्सवरून सुरू असलेला वाद कमी होताना दिसत नाहीये.

पाहा ट्विट – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट

 ‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा

जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार! 

कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट, म्हणाले… 

‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय