काळजी घ्या! किम जोंगच्या उत्तर कोरियातून कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण जग कोरोना नावाच्या महामारीशी दोन हात करत आहे. अशात कोरोना रूग्ण संख्येतील चढ-उतार चालूच आहेत.

उत्तर कोरिया सरकारनं आता कोरोनाचे दोन रूग्ण आढळल्यानं उत्तर कोरियात देशव्यापी लाॅकडाऊन लागू करण्याची घोषणा केली होती. अशात उत्तर कोरियातील मोठी माहिती समोर येत आहे.

कोरोनामुळं 6 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर तब्बल 1 लाख 87 हजार लोकांना आयसोलेट करण्यात आलं आहे.

दोन वर्षात पहिल्यांदाच उत्तर कोरिया सरकारकडून अधिकृत माहिती सादर करण्यात आली आहे. यामध्ये आता देशात आपत्कालिन स्थिती असल्याचं सांगण्यात आलं आहे.

गुरूवारी राजधानी प्योंगयांगमध्ये अनेक रूग्ण ओमिक्रॉननं संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. यावर सध्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत.

मृत्यू झालेल्या सहापैकी एकाचा मृत्यू हा ओमिक्राॅननं झाल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. परिणामी जगातील इतर देशांची चिंता वाढली आहे.

देशाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांनी देशात कोविड निवारणात कोणतीही हलगर्जी चाळणार नसल्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली आहे.

देशाला दोन वर्ष सुरक्षित ठेवण्यात यश आलं होतं पण आता ते शक्य झालं नसल्याचं सरकारी माध्यमांनी कोरोना रूग्ण सापडल्यानंतर जाहीर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस

 ‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”

बाथरूममध्ये SEX करण्याची इच्छा जीवावर बेतली; अत्यंत धक्कादायक प्रकार समोर 

“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी 5 वेळा माफी मागितली असती”