#Corona पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5; आरोग्यमंत्र्यांची माहिती

पुणे | जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे आता पर्यंत पुण्यात 5 रुग्ण अढळून आले आहेत. कोरोना संशयीत रुग्णांची तपासणी केल्यानंतर 4 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता कोरोनाचा 5 वा रुग्णही अढळून आला आहे.

पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा ओला टॅक्सी चालक या दोघांची तपासणी करण्यात आली. त्यांची चाचणी केल्यानंतर त्या दोघांनाही कोरोना झाली आहे. त्यांचबरोबर कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या नातेवाईकांपैकी एक जणाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांवर पुण्यातील नायडू रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 5 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या माहिती आणि उपचारासाठी राज्य निरीक्षण कक्ष 020-26127394 आणि टोल फ्री 104 संपर्क साधण्याचे आवाहन साधण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या भीतीने आईचा जीव कासावीस; मुलाला केलेला कॉल व्हायरल…

“काका जरा जपून महाराष्ट्रातही धक्का बसायचा”

“मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची गरज नाही”

पुण्यात ‘रंगाचा झाला बेरंग; दोन गटात तुफान राडा!

पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या 2 वरुन 4 वर…