“भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा सपाटा सुरु आहे. यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होत असल्यानं आघाडी सरकारला लक्ष केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.

कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं…, असं ट्वीट करत यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

राऊतांच्या या ट्विटवर भाजपनं अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजय राऊत यांनी थोडा उशीर केला अशाप्रकारच्या टोला भाजपकडून लगावण्यात येत आहे.

भाजपच्या प्रतिक्रियेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जप नेत्यांचा भ्रमनिरास झाला असेल. भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहेस कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपचे लोक ध चा मा करण्यात पटाईत आहेत. मी काल काही विषयावर बोलणं टाळलं. एखाद्या विषयावर रोज बोललंच पाहिजे असं नाही. पक्षाची भूमिका असेल तेव्हाच आम्ही बोलतो, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी वरूण गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

महत्त्वाच्या बातम्या – 

  1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार?; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

  मोठी बातमी! कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात 15 दिवसांची जमावबंदी

  “आशिष शेलारांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतायेत”; शिवसेनेचा पलटवार

  Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेल महागलं, वाचा ताजे दर

  IPL 2022: देवदत्त पेडिक्कलचा कॅच वादाच्या भोवऱ्यात; अंपायरच्या निर्णयावर SRH नाराज; पाहा व्हिडीओ