कोरोना आकडेवारीत वाढ चालूच! जाणून घ्या राज्याची आजची आकडेवारी

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये निर्बंध लावण्यासोबतच सरकार लसीकरणावर भर देत आहे.

अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्यानं आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 46 हजार 723 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 28,041 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जानेवारीच्या सुरूवातीपासूनच राज्यातील रूग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं पहायला मिळालं आहे. आता नवी रुग्णसंख्या 40 हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.

गेल्या 3 दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही काही पटींनी वाढल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 16 हजार 420 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थितीवर सरकारकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा वाढ! जाणून घ्या आजचा बाजारभाव

 RTPCR चाचणी निगेटिव्ह आली तरी लक्षणं दिसताय?; मग ‘हे’ कारण असू शकतं

  पैशांसोबतच बायकोकडे ‘या’ गोष्टींची मागणी करणंही गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ