कोरोनाच्या भीतीने स्वत:ला घरात कोंडून घेतलं; दोघांवर मानसिक उपचार सुरु

मुंबई | कोरोना व्हायरस या विषाणूमुळे जगातील तब्बल 80 देश हादरले आहेत. भारतातही हा विषाणू पसरला आहे. तसेच कोरोनाबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात असून भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनाची बाधा होईल या अकारण भीतीने अंधेरीमधील एका तरूण आणि तरूणीवर मानसिक उपचार करण्याची वेळ आली आहे. भीतीने या दोन जणांनी स्वत:ला घरात कोंडून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

आपल्याला संसर्ग होईल या भीतीने या दोघानींही कामावर जाणं बंद केलं होतं. टीव्हीवरील कोरोनाशी निगडित बातम्या पाहून यांची भीती वाढत होती. त्यांनी घराबाहेर जाणं पूर्णपणे बंद केल्याचं कळतंय. घरच्यांना शंका आल्याने त्या दोघांना मनसोपचारतज्ञाकडे नेल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 11 रुग्ण आहेत. पुण्यात 8 नागपूरमध्ये 1 आणि मुंबईमध्ये 2 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्याजवळच्या शिक्रापूरमध्ये आणखी एक कोरोनाचा संशयीत रुग्ण

-#Corona | राष्ट्रवादीच्या सर्व सभा, बैठका रद्द- नवाब मलिक

-सावधान: कोरोनाची माहिती व्हाॅट्सअ‌ॅपवर शेअर केली तर होऊ शकते कारवाई

-…तर सर्दी तापाच्या रोगाप्रमाणे तुम्ही कोरोनातून बरे होऊ शकता!

-कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर पुणे पोलीस करणार ‘ही’ कडक कारवाई