पुणे | जगभरात थैमान घातलेल्या कोरोनानं राज्यात शिरकाव केला आहे. पुण्यात आता 8 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्याजवळील शिक्रापूरमध्येही एक कोरोना संशयीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
शिक्रापूरजवळील गावातला एक व्यक्ती कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असणारा आता आपल्या मूळ गावी परतला. दुबईहून आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोनाची काय लक्षणे आहेत हे शासनाच्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. या व्यक्तीला कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्याने तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात धाव घेतली. तेथील डॉक्टरांनी कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्याने त्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या रुग्णाला दक्षता म्हणून पुण्यातील नायडू रुग्णालयात रवाना केलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 11 रुग्ण आहेत. पुण्यात 8 नागपूरमध्ये 1 आणि मुंबईमध्ये 2 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-#Corona | राष्ट्रवादीच्या सर्व सभा, बैठका रद्द- नवाब मलिक
-सावधान: कोरोनाची माहिती व्हाॅट्सअॅपवर शेअर केली तर होऊ शकते कारवाई
-…तर सर्दी तापाच्या रोगाप्रमाणे तुम्ही कोरोनातून बरे होऊ शकता!
-कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर पुणे पोलीस करणार ‘ही’ कडक कारवाई