“फक्त आजच नाही तर 365 दिवस शिवजयंती साजरी करायला पाहिजे”

औरंगाबाद | शिवजयंती आपल्यासाठी एक सण आहे. शिवजयंती फक्त आजच नाही तर वर्षातील 365 दिवस साजरी करायला हवी, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये एका शिवयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवजयंती ही तारखेनुसार नाही तर तिथीनुसारच साजरी करण्यात यावी कारण आपले दिवाळी, दसरा आणि गणेशोत्सव हे सर्व तिथीनुसारच आहेत आणि आपण ते तिथीनुसारच साजरे करतो. त्यामुळे शिवजयंतीसुद्धा ही तिथीनुसार साजरी करावी, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

कोरोना हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. त्यामुळे सर्वांनी याची खबरदारी घ्यावी असं म्हणत ठाकरेंनी कोरोनाची लागण झाली आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत, असंही म्हटलं.

दरम्यान, कोरोनाचं नाव पुढं करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्य सरकारवर यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या भीतीने स्वत:ला घरात कोंडून घेतलं; दोघांवर मानसिक उपचार सुरु

-पुण्याजवळच्या शिक्रापूरमध्ये आणखी एक कोरोनाचा संशयीत रुग्ण

-#Corona | राष्ट्रवादीच्या सर्व सभा, बैठका रद्द- नवाब मलिक

-सावधान: कोरोनाची माहिती व्हाॅट्सअ‌ॅपवर शेअर केली तर होऊ शकते कारवाई

-…तर सर्दी तापाच्या रोगाप्रमाणे तुम्ही कोरोनातून बरे होऊ शकता!