देशात कोरोनाचा हाहाकार, रूग्णसंख्येत आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ

नवी दिल्ली |  देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. आतापर्यंत दररोज सरासरी 10 हजारांपेक्षा अधिक रूग्ण मिळत असताना आता मागच्या 24 तासांत रूग्णसंख्येत आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

गेल्या 24 तासांत देशात 12 हजार 881 नव्या कोरोना बाधित केस समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 लाख 66 हजार 946 इतकी झाली आहे.

देशात सध्या 1 लाख 60 हजार 384 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 94 हजार 325 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दररोज तीन ते साडे तीन हजार रूग्णांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधितांची वाढ होतो आहे.महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“उद्धव, मुलायम, धिरूभाई… घराणेशाही कुठे नाही?”

-पुन्हा लॉकडाऊन लागणार का?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं ‘हे’ उत्तर

-सुशांतच्या आत्महत्येने शेन वॉटसनही गहिवरला, म्हणाला….

-ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसाठी मंत्री हसन मुश्रीफांची खुशखबर

-भारतीय कंपनीला डावलून चीनला कॉन्ट्र‌ॅक्ट दिले अन्….- जितेंद्र आव्हाड