“उद्धव, मुलायम, धिरूभाई… घराणेशाही कुठे नाही?”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. इंडस्ट्रीत नव्याने येणाऱ्या कलाकारांना असुरक्षिततेची भावना कशी तयार होते. प्रस्थापित लोक त्यांना कसा त्रास देतात, याची चर्चा आता उघड-उघड सुरू झाली आहे. अशातच निर्माते आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी घराणेशाही कुठं नाही? असा उलट सवाल विचारला आहे.

घराणेशाहीवर बोलताना रामगोपाल वर्मा यांनी राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा संदर्भ देत त्यांच्या घराणेशाहीवर बोट ठेवलं आहे. सर्वच कुटुंबं जशी त्यांच्याच कुटुंबांना पहिलं प्राधान्य देतात तसंच बॉलिवूडमध्ये देखील असल्याचं वर्मा म्हणाले आहेत.

मुलायमसिंह यादव, उद्धव ठाकरे यांच्यासारखे राजकारणी आपल्या मुलांना, नातेवाईकांना जसं पहिला प्रेफरन्स देतात, धीरूभाई अंबानी जसं मुकेश आणि अनिल यांनाच आपली सर्व संपत्ती देतात. त्याचप्रमाणं, इतर सर्वच कुटुंबं जशी त्यांच्याच कुटुंबांना पहिलं प्राधान्य देतात. बॉलिवूडमधील कुटुंबंही अगदी तसंच करतात. मग घराणेशाही कुठं नाही?, असं रामगोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, बॉलिवूडमध्ये कसल्याही प्रकारची घराणेशाही नाही. दुसऱ्या कोणत्याही इंडस्ट्रीपेक्षा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं वातावरण आहे, असं मी मानतो. कष्ट करणाऱ्याला यशापासून कुणीच रोखून धरू शकत नाही, असं जेष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांनी म्हटलं आहे. तर बॉलिवूडमध्ये प्रचंड मोठी घराणेशाही आहे. इथे नवोदित कलाकारांना काम करण्यात खूप त्रास होतो, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुन्हा लॉकडाऊन लागणार का?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं ‘हे’ उत्तर

-सुशांतच्या आत्महत्येने शेन वॉटसनही गहिवरला, म्हणाला….

-ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसाठी मंत्री हसन मुश्रीफांची खुशखबर

-भारतीय कंपनीला डावलून चीनला कॉन्ट्र‌ॅक्ट दिले अन्….- जितेंद्र आव्हाड

-“नेहरूंचं परराष्ट्र धोरण चुकलं म्हणून टाळ्या मिळतील पण सैनिकांचं बलिदान थांबवण्याची जबाबदारी मोदींचीच”