‘तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…’; ठाकरे सरकारचं आवाहन

मुंबई | महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकार्याच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी एक ऑनलाइन फॉर्म भरुन द्यावा, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.

तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की खालील लिंकवर क्लिक करुन फॉर्म भरा. आम्ही ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवून त्यांच्याशी समन्वय साधून हवाई वाहतुकीवरील निर्बंध उठल्यानंतर तातडीने तुम्हाला परत आणण्याची व्यवस्था करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यलयाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटबरोबर शेअऱ केलेल्या लिंकवर क्लिक केल्यास एक गुगल फॉर्म ओपन होतो. यामध्ये माहिती देणाऱ्याचा इमेल आयडी, संपूर्ण नाव, कंट्री कोड, संपर्क क्रमांक, कोणत्या देशातील कोणत्या शहरामध्ये अडकले आहात, परदेशात जाण्याचं कारण काय, पासपोर्ट क्रमांक, व्हिजा कोणत्या प्रकारचा आहे, व्हिजाची मुदत कधी संपत आहे यासारखे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ राज्यात दारूवर 70 टक्के कोरोना फी; सरकारच्या निर्णयाने तळीरामांची पंचायत

-“दारू विक्रीसंबंधी केंद्राच्या सूचना असल्या तरी राज्य सरकारने घाई करू नये”

-‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

-काँग्रेस सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात प्रभावी ठरतायेत- अभिजीत बॅनर्जी

-कोरोनाच्या आकडेवारीत मोठा झोल आहे; निलेश राणेंचा आरोग्यमंत्र्यांवर गंभीर आरोप