देश

‘या’ राज्यात दारूवर 70 टक्के कोरोना फी; सरकारच्या निर्णयाने तळीरामांची पंचायत

नवी दिल्ली |  लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असून सोमवारी अनेक ठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी मद्यच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. अशातच दिल्ली सरकारने दारु विक्रीवर स्पेशल कोरोना फी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीमध्ये दारूच्या एमआरपीवर 70 टक्के फी आकरण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळपासून म्हणजे आज सकाळपासूनच हे नवे दर लागू झाले आहेत. उत्पादन शुल्क आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, पोलिसांना दारुच्या दुकानांवर कायदा, सुव्यवस्था निर्माण करण्यास मदत करण्याबाबत सांगितलं आहे.

दिल्लीत सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 पर्यंत दारुची दुकानं सुरु राहणार आहेत. असं असलं तरी वाईन शॉप बाहेरील गर्दी टाळण्यासाठी दारु विक्रीची वेळ वाढवली जाऊ शकते, असा अंदाज आता वर्तवण्यात येऊ लागला आहे.

दरम्यान, लॉकडाउनमध्ये काल पहिल्यांदाच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये देशातल्या अनेक शहरांमध्ये दारूच्या खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.

महत्वाच्या बातम्या-

-“दारू विक्रीसंबंधी केंद्राच्या सूचना असल्या तरी राज्य सरकारने घाई करू नये”

-‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

-काँग्रेस सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात प्रभावी ठरतायेत- अभिजीत बॅनर्जी

-कोरोनाच्या आकडेवारीत मोठा झोल आहे; निलेश राणेंचा आरोग्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

-काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा- संजय राऊत