प्रेरणादायी! 85 वर्षांच्या आजी मजूरांना देतायत 1 रुपयात इडली चटणी

कोयंबटूर | देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांना टाळं लागलं आहे. मजुरांचं मोठं नुकसान झालं आहे. हातात पैसे नसल्यानं खाण्याची भ्रांत असलेल्या मजुरांसाठी 85 वर्षांच्या अम्मानं 1 रुपयांत इडली देण्याचा घाट घातला आहे.

सध्या प्रत्येकजण आपल्या खिशात पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. बर्‍याच ठिकाणी लोक स्थलांतरित मजुरांना खायला घालत आहेत. तमिळनाडू इथे 85 वर्षांच्या आजीनंही आपल्या परीनं मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

कोयंबटूर शहरापासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका गावातील 85 वर्षांच्या आजी मजुरांसाठी 1 रुपयांत इडली आणि चटणी विकत आहेत. आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून त्या 1 रुपयांत इटली चटणी विकण्याचा त्यांचा नित्यक्रम सुरू आहे.

लॉकडाऊनदरम्यान अनेक दुकानं बंद झाली मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं तरीही या अम्मानं आपल्या इडली आणि चटणीचा दर कधी वाढवला नाही.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी!

-उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत

-“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”

-“भारत कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”

-“महाराष्ट्रात माणसाच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलं नाही”