पुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद

पुणे | पुण्यात कोरोनामुळे अनेक जणांना आपाल जीव गमवावा लागला आहे. सर्वतोपरी प्रयत्न करुनही पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता पुण्यात सोशल डिस्टन्सिंगचं कोटकोरपणे पालन व्हावं यासाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत.

पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवस अतिरिक्त निर्बंध राहणार आहेत. 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 तीन मेपर्यंत रात्री 24 वाजेपर्यंत हे अतिरिक्त निर्बंध असणार आहेत.

सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. अतिरिक्त निर्बंध लागू केलेल्या ठिकाणी किराणा, भाजीपाला, फळं, चिकन, मटण, अंडी यांची विक्री, दुकानं वितरण सेवा पूर्ण बंद राहील.

गुलटेकडी, महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड,
मोदीखाना कुरेशी मस्जिद, भीमपुरा लेन, बाबाजान दर्गा, शिवाजी मार्केट शितलादेवी मंदिर, ताडीवाला रस्ता,  बालाजीनगर, पर्वती दर्शन परिसर, लक्ष्मी नगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर या भागात अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

-एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये- उद्धव ठाकरे

-“काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय”

-परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

-माझ्या पराभवासाठी चीन काही करू शकतं- डोनाल्ड ट्रम्प