मुंबई | विविध वक्तव्ये आणि कारणांनी सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
बोगस जात प्रमाणपत्र (Fake Caste Certificate) प्रकरणात त्यांना मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट (Non Bailable Warrant) बजावला आहे. नवनीत राणा यांच्यासोबत त्यांच्या वडिलांना देखील वॉरंट बजाविण्यात आले आहे.
यापूर्वी देखील त्यांना या स्वरुपाचे वॉरंट बजाविण्यात आले होते. हे दुसरे वॉरंट त्यांना आता बजाविण्यात आले आहे. राणा यांनी राखीव कोट्यातून लोकसभेची (Lok Sabha 2019) निवडणूक लढविली होती.
नवनीत राणा यांनी राखीव कोट्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी अनुसूचित जातीचे (Schedule Caste) बोगस प्रमाणपत्र मिळवून सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नवनीत राणा यांचा मतदार संघ 2019 साली अनुसूतित जातींसाठी राखीव ठेवण्यात आला होता. आपण अनुसूचित जातीच्या असल्याचे सांगून राणा यांनी तेथून निवडणूक लढविली होती.
शाळा सोडल्याच्या (School Leaving Certificate) दाखल्यात राणा यांनी फेरफार करुन बोगस जात प्रमाणपत्र मिळविल्याचे आढळले आहे. यानंतर राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग राम सिंग कुंडलेस या दोघांच्या विरोधात मुलुंड पोलीस स्थानकात (Mulund Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नवनीत राणा यांना त्यांचे जात प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश गतवर्षी दिला होता. त्याच्याविरोधात राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) धाव घेतली होती.
महत्वाच्या बातम्या –
शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा वाद निकालात; शिवाजी पार्कवर कोण घेणार, ‘दसरा मेळावा’?
फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचा निकाल जाहीर
“… तर आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल”; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपवर केली टीका; म्हणाल्या काँग्रेसच्या…