शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा वाद निकालात; शिवाजी पार्कवर कोण घेणार, ‘दसरा मेळावा’?

मुंबई | शिवसेनेचा सालाबादप्रमाणे होणारा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क (Shivai Mark) मैदानावर घेण्यासाठी शिवसेनेने महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने देखील तिथेच मेळावा घेण्यासाठी अर्ज केला होता.

महानगरपालिकेने दोनही अर्जांची छाणणी करत पोलिसांकरवी एक अहवाल मागविला होता. अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत, पालिकेने दोनही गटांना परवानगी नाकारली होती.

शिवसेनेकडून महापालिकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान करण्यात आले होते. त्यावर आता सुनावणी पार पडली आहे. आणि उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

न्यायलयात मुंबई महानगरपालिका, शिंदे गट आणि शिवसेना या तीनही गटांनी युक्तीवाद केला. तीघांची बाजू एकूण घेतल्यावर न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.

यावेळी महत्वाची बाब म्हणजे न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाचा अर्ज फेटाळला आहे. अर्ज नाकारुन पालिकेने योग्य निर्णय घेतला होता, असे निरीक्षण देखील  न्यायालयाने नोंदविले.

त्यामुळे आता गेले अनेक दिवस शिंदे गटाकडून मात खाणाऱ्या शिवसेनेने एक तरी लढाई जिकली आहे, असे म्हणावे लागेल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी न्यायालयाबाहेर आनंद साजरा केला.

एकनाथ शिंदे यांच्या गटाचा अर्ज फेटाळला गेल्याने शिवसेनेला न्याय मिळाला, असे मत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शिंदे यांच्या गटातून अद्याप कोणाची प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या –

फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचा निकाल जाहीर

“… तर आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल”; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा

नगर-अष्टी रेल्वे मार्गाच्या उद्घाटनात पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या ”गोपिनाथ मुंडे यांचे…”

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे कारभार सांभाळतात! राष्ट्रवादीने दिला पुरावा

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपवर केली टीका; म्हणाल्या काँग्रेसच्या…