“आंबेडकरी शक्तीला, तरुणांना भावनिक बनवून, भडकविण्याचे प्रयत्न काही वर्षांपासून सुरु आहेत”

मुंबई | कोरोना बरोबरच राजकीय पातळीवर सुद्धा आव्हानात्मक परिस्थिती आहेच. 14 एप्रिल रोजी बाबासांहेबांच्या जयंतीदिनी डॉ आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलाखा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एन. आय. ए. च्या स्वाधीन झाले. त्यांना अडकवणाऱ्या सर्व सामाजिक-राजकीय शक्तींना हरवूया, असा निर्धार वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

भाजप सरकार हे सातत्याने एका बाजूला आपल्या अस्मितेच्या प्रतीकांवर हल्ला करून ती मोडीत काढण्याचा आणि दुसर्‍या बाजूला आपल्या उपजीविकेची साधने हिरावून घेत आहे, असा आरोप करत हा लढा दीर्घकालीन आहे आणि तो ही आपल्याला नंतर लढावाच लागणार आहे. राज्यघटना आणि न्यायालयावर आपला विश्वास आहे आणि तो विश्वास कायम ठेवूनच आताच्या महाकठीण परिस्थितीवर लक्ष केंद्रित करूया, असं ते म्हणाले आहेत.

१४ एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे. भारतातील सर्वच स्तरातील नागरिकांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारा आनंद निर्माण करणारा हा दिवस. त्यामुळे हा दिवस कायम एक आनंदाचा सोहळा म्हणूनच साजरा केला गेला पाहिजे. तेलतुंबडेंना अटक झाल्यानंतर राजगृहावर काळे फडके फडकावल्याचा मुद्दा सोशल मिडिया आणि प्रसार माध्यमांतून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला गेला. त्याला कुणीही वेगळ्या प्रकारे विचारात घेऊ नये किंवा कोणत्याही प्रकारे काळा दिवस असल्याचे मानता कामा नये, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बाबासाहेब म्हणाले तसे आपल्याला “भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही” विरोधी- विशेषतः आताच्या संदर्भात फ़ॅसिस्ट शक्तीच्या विरोधात खुप विचारपूर्वक लढत द्यावी लागेल. या शक्तींच्या कायम विरोधात उभ्या राहिलेल्या देशभरातील आंबेडकरी शक्तीला, तरुणांना भावनिक बनवून, भडकविण्याचे प्रयत्न केल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक सुरु आहेत आणि गेल्या काही दिवसात ते अधिक प्रखर झालेले दिसत आहेत. ही आपल्या सर्वांच्या परीक्षेची वेळ आहे. म्हणून कोरोना विरुद्धच्या लढ्यावर संपुर्ण लक्ष देत या ब्राह्मणी-फ़ॅसिस्ट शक्ती आणि भांडवली शक्तींविरुद्धची लढाई संविधानाच्या आणि संसदीय राजकारणाच्या चौकटीत तीव्र करत तुरुंगातील आनंद तेलतुंबडें आणि इतर सर्व मानव अधिकार कार्यकर्त्याना अडकवण्या-या सामाजिक-राजकीय शक्तींना हरवू या, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जमा केलेला निधी आपण दुर्बल घटकांसाठी वापरूयात- प्रकाश आंबेडकर

-देशात लॉकडाऊन, मात्र मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामींच्या मुलाचा लग्नसोहळा थाटामाटात

-MPSC EXAM: वयाची मुदत संपणाऱ्या परीक्षार्थींना 1 वर्ष वाढवून देण्याचा मंत्री उदय सामंतांचा शब्द

-“वाटलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सर्वांना समान न्याय भेटेल पण…”

-“शिधावाटपाच काम विनातक्रार व्हावं यासाठी पालकमंत्र्यांनी जातीनं लक्ष घाला”