होय… खेकडे धरण फोडू शकतात!- आदित्य ठाकरे

सोलापूर |  जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण फुटीचं खापर खेकड्यांवर फोडलं होतं. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. मंत्री सावंतांच्या वक्तव्याचीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी री ओढली आहे.

सोलापूरातल्या एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य यांनी खेकडे धरणं फुटण्याला कसे कारणीभूत ठरतात, याचं त्यांनी उदाहण दिलं. आणि खेकडे धरण फोडू शकतात या सावंतांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहोत याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला.

आदित्य ठाकरेंच्या आजच्या वक्तव्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रभर खेकड्यांमुळे धरण फुटू शकते का?? यावर चर्चा झडण्याची शक्यता आहे.

तानाजी सावंत यांनी तिवरे धरण खेकड्यामुंळे फुटल्याची अजब थेअरी महाराष्ट्राला सांगितली होती. त्यावेळी विरोधी पक्षांनी सावंत यांच्याविरोधात जोरदार आंदोलने केली होती.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी सावंतांच्याच वक्तव्याचाच पुनरूच्चार केल्याने विरोधी पक्षांच्या हातात आयतंच कोलित सापडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात ‘शिवस्वराज्य’ यात्रा; उदयनराजे असणार ‘स्टार कॅम्पेनर’!

-“ओव्हरफ्लो झालेलं जहाज बुडतं हा नियम आहे… भाजपचं जहाज नक्की बुडणार”

-“तोंडातून फेस येईपर्यंत ज्यांच्यावर टीका केली… आज त्यांच्याच कळपात प्रवेश केला”

-आघाडीच्या नेत्यांना कसं फोडलं??? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गुपित रहस्य!

-मी गद्दार नाही…. पळून गेले नाही- चित्रा वाघ