Weather Update: पुढील 3 दिवसात राज्याच्या ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस

मुंबई | भारतीय हवामान विभागाकडून पुढील 3 दिवसांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशाच्या मध्यवर्ती भागात पुर्वेकडील वाऱ्यांचा संगम होत असल्याने त्याचा परिणाम इतर भागांवर होताना दिसतोय. महाराष्ट्रामध्ये 8 ते 9 मार्च दरम्यान गारपीट होण्याचा इशारा देखील दिलाय.

पुर्वेकडील वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुणे, अहमदनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असल्याने आता येत्या काळात पावसाची व्याप्ती देखील वाढू शकते.

दक्षिण महाराष्ट्रामधील सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, सिंधुदुर्ग, नांदेड आणि मुंबई वगळता राज्यात सर्वत्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागील पावसाळ्यात ढगाळ हवामानमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर महापूरामुळे देखील मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, मुंबईवर चक्रीवादळाचं संकट घोंघावू लागल्याने आता समुद्र किनारी राहणार्याना समस्येचा सामना करावा लागू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

Credit Card वापरणाऱ्यांनो… ‘या’ 4 गोष्टी आवश्य जाणून घ्या

ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; वाचा आजचे ताजे दर

नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टानं ‘या’ तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर

“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”