बुमराह म्हणतोय,”…तर मला टेस्ट टीमचा कॅप्टन व्हायला आवडेल”

मुंबई | भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विराटवर टीका होत असल्याचं दिसतीये.

विराटनंतर आता भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार कोण?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यावर आता सोशल मीडियावर आणि क्रिडाविश्वात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

विराटचा टेस्टचा उत्तराधिकारी म्हणून आता रोहित शर्मा याचं नाव घेतलं जात आहे. तर के एल राहुल याचं नाव देखील चर्चेत आहे. अशातच भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) मोठं वक्तव्य केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने सोमवारी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्याचबरोबर संधी मिळाल्यास कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करण्यास तयार असल्याचं देखील बुमराहने म्हटलं आहे.

दुसरीकडे, विराटबद्दल बोलताना बुमराह म्हणाला की, तो अजूनही लोकेश राहुलला कर्णधारपदासाठी मदत करेल आणि तो मोठे निर्णय घेण्यात विराटचं योगदान देईल, असंही तो म्हणाला आहे.

सिराजच्या फिटनेसबद्दल बुमराहने सांगितलंय की तो आता बरा झाला आहे आणि एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली मी माझी पहिली कसोटी खेळलो. तो कर्णधारपदासाठी मदत करत राहील, असंही तो म्हणाला.

टीम मिटींगमध्ये आम्हाला याबाबत सांगण्यात आलं होतं,त्यानंतरच विराटने त्याची जाहीर घोषणा केली असंही बुमराह म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?”