सचिन तेंडूलकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आता उशीर झालाय पण, रोहित-राहुलची जोडी…”

मुंबई | रवी शास्त्रीनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी जिग्गज खेळाडू ‘द वाॅल’ म्हणजेच राहुल द्रविडची (Rahul Dravid) निवड करण्यात आली होती. तर दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील कर्णधारपदावरून पायउतार झाला.

कोहलीच्या या निर्णयानंतर भारतीय संघाचं काय होणार?, असा सवाल क्रिडाविश्वात विचारण्यात येत होता. त्यानंतर भारताचा कर्णधार म्हणून सलामीवीर रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड करण्यात आली.

भारताने दक्षिण अफ्रिकेविरूद्धी वनडे आणि कसोटी मालिका मगावल्यानंतर आता कॅप्टन रोहित आणि कोच राहुल द्रविडची जोडी पुन्हा मैदानात दिसणार आहे. त्यावर आता भारताचा माजी स्टार खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघाने 2011 मध्ये विश्वचषक जिंकला होता. भारताला विश्वचषक जिंकून आता 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता नव्या विजयासाठी खूप उशिर झालाय, असं सचिन म्हणाला आहे.यामध्ये बराच कालावधी लोटला आहे.आता सर्वच जण विश्वचषकाच्या विजयाची वाट पाहत आहे, असंही सचिन म्हणाला.

रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची जोडी खूपच चांगली आहे. त्यामुळे ते नक्कीच विश्वचषक जिंकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील. ही जोडी आपल्या क्षमतेपैक्षा जास्त प्रयत्न करेल, असा विश्वास देखील सचिनने व्यक्त केला आहे.

विश्वचषक ही मोठी स्पर्धा असते, त्यासाठी भारताकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. विश्वचषक नेहमीच खास असतो. त्यामुळे यंदा भारतीय संघाकडून चांगली कामगिरी होईल, असा विश्वास सचिने यावेळी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं…

आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी

टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता

मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”