Omicron किती वेळ जिवंत राहू शकतो?, अभ्यासातून सर्वात मोठा खुलासा झाला

मुंबई | मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) आणि ओमिक्राॅन (Omicron) रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन व्हेरियंट पुन्हा अडचणी वाढवणार की काय ?, अशी चिंता सतावत आहे. अशातच आता ओमिक्राॅन किती वेळ जिवंत राहू शकतो, यावर मोठं संशोधन झालं आहे.

जपानमधील क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना SARS-CoV-2 वुहान स्ट्रेन आणि वातावरणातील इतर सर्व प्रकारातील व्हायरस यांच्यातील संबंध सापडला आहे.

अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकार वुहान स्ट्रेनपेक्षा प्लास्टिक आणि त्वचेच्या पृष्ठभागावर दुप्पट जास्त काळ टिकल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे वेळोवेळी स्वच्छता राखणं गरजेचं सांगण्यात आलं आहे.

Omicron त्वचेवर 21 तासांपेक्षा जास्त आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर 8 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकतो, अशी महत्त्वाची या अभ्यासातून माहिती समोर आली आहे. त्वचेवरचे विषाणू कोरोनाच्या इतर व्हेरियंटला शरिरात जास्त काळ राहण्यासाठी मदत देखील करतात.

ओमिक्रॉनमध्ये सर्वाधिक पर्यावरणीय स्थिरता असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे कदाचित डेल्टा व्हेरिएंटमध्ये होणारा बदल आणि वेगाने पसरण्यास मदत होते, असंही अभ्यासकांनी सांगितलं आहे.

ओमिक्राॅन व्हेरियंट प्लास्टिकवर सर्वात जास्त काळ म्हणजेच 193 तास जिवंत राहू शकतो. तर त्वचेवर ओमिक्राॅन 8 तास जिवंत राहू शकतो. अल्फा आणि बीटा प्रकारांमध्ये वेळेत फारसा फरक नव्हता आणि त्यांच्यात समान सुसंगतता होती, असंही समोर आलंय.

मागील काही दिवसांपासून सर्वच जण साॅनिटायझरचा वापर करत आहोत. त्यामुळे आता कोरोना व्हेरियंटमध्ये ज्याला प्रतिरोधक शक्ती निर्माण झाल्याचं देखील दिसून आलं आहे.

दरम्यान,जगभरातील संक्रमित रूग्णांची झपाट्यानं वाढणारी संख्या पाहता ओमिक्रॉन प्रकार चिंतेचा विषय असल्याचं देखील संशोधकांनी अभ्यासातून सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सचिन तेंडूलकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आता उशीर झालाय पण, रोहित-राहुलची जोडी…”

मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं…

आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी

टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता

मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश