राज ठाकरेंवर टीका करत रूपाली ठोंबरेंचा वसंत मोरेंना पाठिंबा, म्हणाल्या…

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची भूमिका मांडत आता येत्या काळात मनसेची हिंदूत्वाच्या वाटेवर चालणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील समीकरणे बदलणार की काय?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात चौफेर फटकेबाजी करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.

त्यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काही महिन्यांपूर्वीच मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी देखील आता राज ठाकरेंवर टीका केली आहे.

राज ठाकरेंची सभा ही भाजपाची होती. राज ठाकरेंनी यू-टर्न घेतलाय. असं होईल हे कोणालाही वाटलं नव्हतं, असं रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.

शरद पवारांमुळे जातीवाद वाढला, असं राज ठाकरे म्हणतात. मग हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असते का?, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेवर आता मनसेचे अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच मनसेचे पुण्यातील दिग्गज नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यावर रूपाली ठोंबरे पाटील यांनी वसंत मोरेंची पाठराखण केली आहे. बहीण म्हणून मी वसंत मोरेंच्या पाठीशी आहे. त्यांनी जी भूमिका घेतली, ती योग्यच आहे, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, असं ठोंबरे पाटील म्हणाल्या.

दरम्यान, मनसेच्या बदलत्या भूमिकेमुळे आता राज्यातील राजकीय वारे पलटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता आगामी काळात भाजप मनसे युती होणार का?, यावर चर्चांना उधाण आलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

Sharad Pawar: राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?, शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“…तर पवारांची औलाद सांगणार नाही”, अजितदादांनी दंड थोपटले

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात