Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. तब्बल 25 मिनिटं या दोन्ही नेत्यामध्ये बैठक पार पडली.

लक्षद्विपच्या विषयावर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मुद्दे मांडल्याची माहिती लक्षद्विपचे राष्ट्रवादीचे खासदार मोह्म्मद फैजल यांनी दिली आहे. त्याचबरोबर ईडीच्या कारवाईवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांच्यावर ईडीने कारवाई संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली आहे. ही गोष्ट मी त्यांच्या कानावर घातली. त्यावर ते विचार करतील, असं शरद पवार म्हणाले आहेत.

संजय राऊतांवर कारवाईची काय गरज होती?,असा सवाल देखील शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला आहे. मोदी योग्य निर्णय घेतील, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

12 आमदांराच्या मुद्द्यावरून देखील चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली आहे. अडीच वर्ष झालं तरी सदस्य निवडले गेले नाहीत, अशी खंत देखील पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे राज्यातील समीकरण बदलणार का?, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“…तर पवारांची औलाद सांगणार नाही”, अजितदादांनी दंड थोपटले

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

“अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा…”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

अजान, हनुमान चालीसा वादावर अनुराधा पौडवाल यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…