पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेल्या अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली | स्वातंत्र्योत्तर भारताची सर्वाधिक वेळा कोणासोबत लढाई झाली आसेल तर ती पाकिस्तानसोबत झाली आहे. आपल्या अदम्य साहसाच्या जोरावर भारतीय सैनिकांनी नेहमीच भारताचा तीरंगा फडकवत ठेवला आहे.

2019 च्या फेब्रुवारी महिन्यात भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या विरतेचा बदला म्हणून आपल्या सैन्यानं पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांना संपवण्याची मोहीम हातात घेतली होती.

पुलवामाचा बदला म्हणून बालाकोट एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान अनेक दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातलं. याला उत्तर म्हणून भारत-पाकिस्तानदरम्यान हवाई युद्ध चालू झालं होतं.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं लडाकू विमान जमीनदोस्त केलं. पण पाकिस्तानी हवाई हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात अभिनंदन यांचं विमान पाकव्याप्त काश्मिरमध्ये कोसळलं होतं.

भारताच्या या हिरोला आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीर चक्र या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. अभिनंदन वर्धमान हे नाव भारताच्या शौर्याचं प्रतिक आहे.

27 फेब्रुवारी 2019 रोजी अभिनंदन यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत या भारतभूमीसाठी अतुलनीय शौर्याचा नमुना सादर केला होता. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अभिनंदन यांनी पाकिस्तानला लोळवलं होतं.

पाकिस्तानच्या हवाई ताकदीचा अभिनंदन यांनी पार चुराडा केला होता. अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्यानं पकडल्यानंतर अंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या वेगवान हालचालींमुळं अभिनंदन यांना तात्काळ सोडण्यात आलं होतं.

अभिंदन वर्धमान यांना त्यांच्या साहसाबद्दल भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप कॅप्टन हे पद देण्यात आलं आहे. अभिनंदन वर्धमान यांच्या साहसाला अवघा देश सलाम करत आहे.

राष्ट्रपती भवनात पंतप्रधानांसह सर्व मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन यांना वीर चक्रानं सन्मानित केलं आहे. वीर चक्र हे सैनिकांना त्यांच्या अतुलनीय साहसासाठी देण्यात येतं.

दरम्यान, बालाकोट एअरस्ट्राईकमध्ये भारताच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन पाकिस्तानला घडलं होतं. अभिनंदन वर्तमान आणि इतर सहकाऱ्यांच्या साहसानंच तर आपली भारतीय सिमा सुरक्षित आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

 ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगणा राणावतला मोठा झटका, आता…

“विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, ती वेळ…” 

“मोदीसाहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत” 

“नरेंद्र मोदी सर्वात मोठे नौटंकीबाज, ते चुकून राजकारणात आलेत” 

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर ‘फोटोबॉम्ब’; वानखेडेंचं टेंशन वाढलं