शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घट; वाचा कारण

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये सेन्सेक्स (Sensex) आपल्या सर्वकालीन उच्चांकावर होता. त्यामुळे फक्त 8 महिन्यात गुंतवणूकदारांची चांदी झाल्याचं पहायला मिळालं. मात्र आता शेअर बाजारात मोठी घट (big drop in the stock market) झाल्याचं पहायला मिळालं आहे.

गेल्या काही व्यवसायिक सत्रांमध्ये शेअर बाजारात दिसलेला विक्रीचा कल सोमवारी देखील कायम राहिल्याचं पहायला मिळालं आहे. यामुळे सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स 1,200 अंकांपेक्षा अधिक घसरून 58,362 पर्यंत खाली कोसळला आहे.

सेन्सेक्सबरोबरच निफ्टी (Nifty) देखील जवळपास 400 अंकांनी घसरून 17,365 वर आला आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर सेन्सेक्स 59,000च्या खाली आल्याचं पहायला मिळालं.

जागतिक पातळीवर होत असलेल्या निर्गुंतवणुकीमुळे आणि बेंचमार्क इंडेक्समध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानं भारतीय बाजारात घसरण झाली.

याशिवाय, युरोपमधील अनेक भागांमध्ये कोरोना विषाणूचा पुन्हा विस्फोट पहायला मिळाल्याने गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आगामी काळात सेन्सेक्स आणखी खाली जाण्याची शक्यता देखील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

सेन्सेक्स 59,100च्या सपोर्ट लेवलच्या खाली गेला आहे. या परिस्थितीत पैसे जातील या भीतीमुळे गुंतवणूकदार आपले शेअर्स विकू शकतात. त्यामुळे सेन्सेक्सची पुढील सपोर्ट लेवल 57200-57500 दरम्यान दिसेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

निफ्टी सध्या ‘अनिश्चित स्थितीत’ आहे आणि जर तो व्यापार बंद होण्याच्या वेळी 17,600 च्या खाली बंद झालाय त्यामुळे आता तो 17,200 पर्यंत देखील खाली जाऊ शकतो, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शिवाय, मारुती, बजाज फायनान्स, कोटक बँक आणि बजाज फिनसर्व्ह देखील आज खाली आले. दुसरीकडे, भारती एअरटेल, पॉवरग्रिड, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक आणि आयटीसी या कंपन्यांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

मागील सत्रात म्हणजेच गुरुवारी सेन्सेक्स 372 अंकांच्या घसरणीसह 59636 अंकावर बंद झाला. त्याचप्रमाणे, निफ्टी 133 अंकांनी घसरून 17,764 वर बंद झाला होता.

दरम्यान, आता सेनसेक्समध्ये घट झाल्याने आता गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या आहे. सध्या मंदीची वेळ असली तरी आगामी काळात मोठी वाढ होण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीकडून भाजपला दे धक्का

‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगणा राणावतला मोठा झटका, आता…

“विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, ती वेळ…” 

“मोदीसाहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत” 

“नरेंद्र मोदी सर्वात मोठे नौटंकीबाज, ते चुकून राजकारणात आलेत”