Top news पुणे महाराष्ट्र

लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना; स्वागतासाठी बापाने हेलिकॉप्टर मागवला

Father Daughter

पुणे | पुण्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे लेकीच्या जन्माचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून मुलीच्या जन्माचं जंगी स्वागत केलं आहे.

मुलीच्या स्वागतासाठी फुलांच्या हारही घालण्यात आलं. गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आई आणि बाळाचं स्वागत करण्यात आलं आहे.

गावात हेलिकॉप्टर उतरताना आणि मुलीला पाहण्यासाठी ग्रामस्थही उपस्थित होते. मुलीच्या जन्माचं जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे.

आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीचे स्वागत विशेष करण्यासाठी आम्ही 1 लाख रुपयांच्या चॉपर राइडची व्यवस्था केली आहे, असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं.

आमच्या घरात खूप दिवसांनी मुलीचा जन्म झाला आणि त्यामुळे अत्यंत आनंद झाला आहे. म्हणून मी आणि माझी पत्नी, लेक राजलक्ष्मीला 2 एप्रिलला हेलिकॉप्टरने घरी आणलं, असं ते म्हणालेत.

आम्ही देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जेजुरीला गेलो, पण तेथे जाण्यासाठी परवानगी नसल्याने, आम्ही आकाशातून प्रार्थना केली, असं मुलीचे वडिल विशाल झरेकर म्हणाले.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

आरबीआयचा ‘या’ 3 बँकांना झटका; केली मोठी कारवाई 

कोरोनाचं नवं गंभीर लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका! 

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर दीपाली सय्यद संतापल्या, म्हणाल्या… 

भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेचा संताप; दिला ‘हा’ गंभीर इशारा 

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा इशारा