आरबीआयचा ‘या’ 3 बँकांना झटका; केली मोठी कारवाई

मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 3 सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. तिन्ही बँकांना पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांमध्ये 2 बँका महाराष्ट्रातील आणि एक पश्चिम बंगालमधील आहे. मार्चमध्येही रिझव्‍‌र्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने आठ बँकांना दंड ठोठावला होता.

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटलं आहे की, फलटणमधील यशवंत सहकारी बँक लिमिटेडला (Yashwant Cooperative Bank Limited) उत्पन्न, मालमत्ता वर्गीकरण, तरतुदी आणि इतर समस्यांवरील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबईतील कोकण मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडलाही (Kokan Mercantile Co-operative Bank Ltd) दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच कोलकाता येथील समता सहकारी विकास बँकेलाही एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मणिपूर महिला सहकारी बँक लिमिटेड, युनायटेड इंडिया सहकारी बँक लिमिटेड, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, अमरावती मर्चंट सहकारी बँक लिमिटेड, फैज मर्कंटाइल सहकारी बँक लिमिटेड आणि नवनिर्माण सहकारी बँक लिमिटेड यांना हा दंड ठोठावला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोनाचं नवं गंभीर लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका! 

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर दीपाली सय्यद संतापल्या, म्हणाल्या… 

भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेचा संताप; दिला ‘हा’ गंभीर इशारा 

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा इशारा 

गडकरी म्हणाले, “रोहित तू बिंधास्त जा, तुझं काम झालंच म्हणून समज”