सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठी घसरण, आतापर्यंत तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त

मुंबई | सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होताना पहायला मिळत आहे. मंगळवारी रात्री जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या विक्रीच्या अनुषंगाने दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव 49 रुपयांनी घसरुन प्रति 10 ग्रॅम 43,925 रुपयांवर गेले. HDFC सेक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या व्यापार सत्रामध्ये सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 43,974 रुपयांवर बंद झाले होते.

गेल्या काही दिवसात सोनं 12 हजार रुपयांनी स्वस्त; सोन्यात गुंतवणूक करणं फायद्याचं कसं? हे पाहण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा-

सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल आहे, त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथली लोकसंख्या आणि या लोकसंख्येला असलेली सोन्याची चाहत या गोष्टीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

gold 8
Photo Cortesy- Pixabay

गेल्या काही दिवसांपासून सोने तसेच चांदीच्या भावात सातत्याने मोठे चढ-उतार पहायला मिळत आहेत. मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद होताना मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 640 रुपयांनी वाढले तर चांदीच्या दरात 1800 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालं.

मुंबई आणि पुण्यात काय आहे सोन्याचा भाव?

मुंबई आणि पुण्यात मंगळवारी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,620 रुपये इतका होता, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,620 रुपये इतका आहे.

Gold 2
Photo Cortesy- Pixabay

चांदीच्या दरात मात्र एक दोन नव्हे तर तब्बल 1800 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता 63,900 रुपये मोजावे लागणार आहेत. सोमवारचा दर ऐकला तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही कारण सोमवारी हाच दर 65,700 इतका होता. म्हणजेच एका दिवसात चांदीच्या दरात मोठी घट झाल्याचं पहायला मिळत आहे.

एका दिवसातच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्यासोबतच चांदीचे भाव देखील सातत्याने वर खाली होत असल्याचं दिसून येत आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसांचा जरी विचार केला तरी या भावात मोठ्या प्रमाणात दरात चढ-उतार झाल्याचं दिसत आहे.

gold 5
Photo Cortesy- Pixabay

गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तो आज 65,700 रुपये इतका झाला आहे. म्हणजेच गेल्या एका महिन्यात चांदीचे भाव चांगलेच घसरल्याचं पहायला मिळत आहे. 28 फेब्रुवारीचे भाव आणि आजचे भाव यांचा विचार करता चांदीच्या भावात तब्बल 1800 रुपयांची घसरण झाल्याचं दिसून येत आहे.

सोन्याच्या भावात कशाप्रकारे चढउतार सुरु?

चांदीच्या भावाप्रमाणे सोन्याच्या भावातही मोठे चढ उतार पहायला मिळत आहे. एकूण विचार केला तर सोने स्वस्तच होताना दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांचा विचार करता केवळ 24 तारखेला सोन्याची किंमत 1020 रुपयांनी वाढली होती, त्यानंतर काल 640 रुपयांची वाढ झाली आहे.

Gold 7
Photo Courtesy- PNG

अन्यथा इतर दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाल्याचं पहायला मिळालं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता, तो आता कमी झाल्याचं पहायला मिळत आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

Gold
Photo Cortesy- Pixabay

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं होणारी घसरण होताना पहायला मिळत आहे. सोनं हा भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा गुंतवणुकीचा पर्याय आहे, त्यामुळे कोसळते दर पाहता गुंतवणुकदारांचा कल आता गुंतवणुकीसाठी या पर्यायाकडे वाढला आहे.

अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा अधिक सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय वाटतो, काही झालं तरी आपल्याकडील सोनं कुठं जाऊ शकत नाही, अशी धारणा त्यामागे असते, त्यामुळे अनेकजण मार्केट पाहून या पर्यायकडे वळताना दिसतात. भारतात सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

jewellery 1
Photo Cortesy- Pixabay

तब्बल 12 हजार रुपयांनी सोनं स्वस्त-

भारतात सोन्याची क्रेझ जास्त असते त्यामुळे त्याच्या दरात मोठे चढउतार पहायला मिळतात, मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात झालेले चढउतार मात्र सर्वांना आश्चर्यचकीत करणारे आहेत.

देशात कोरोनाचा प्रभाव वाढायला लागला तसे सोन्याचे भाव देखील वाढायला लागले होते, त्यांनी आतापर्यंतचं सर्वात महाग सोनं होण्याचा विक्रम देखील नोंदवला होता, सर्वसामान्यांना सोनं घेणं कठीण बनलं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता.

gold 6
Photo Cortesy- Pixabay

त्यानंतर मात्र सोन्याच्या भावाला उतरती कळा लागली, प्रत्येक महिन्यात सोनं हळूहळू उतरु लागलं. सोन्याचं मार्केट किती डाऊन होईल याचा कुणाला अंदाज नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 12 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळत आहे. त्यामुळे आता हीच सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ व्यक्तीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…

पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

नाशिक शहरात परिस्थिती गंभीर! कोरोना रुग्णांना बेड न…

…अन् जंगलाचा राजा पाण्यातील बदकासोबत खेळू लागला; पाहा…

वाह! क्या बात है’; या मुंगुसाचा अभिनय पाहून…