“दादाच्या नादी लागल्यावर काय होतं ते इंदापूर अन् पुरंदरने पाहिलंय”

पुणे | आमचा दादा हा दादाच आहे. दादाच्या नादी लागल्यावर काही होऊ शकते. हे आपण इंदापूर व पुरंदर ला पाहिलं आहे असं म्हणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar)यांचं कौतुक करून हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढल्याचं दिसून आले.

इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावात भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Minister of State Dattatreya bharne) बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचे फोटो वायरल होऊन इंदापूर तालुक्‍यात याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर शहरातील नूतन नगरपालिकेच्या इमारतीसाठी अधिकचा निधी आणण्यासाठी आपण स्वतः आणि नगराध्यक्ष यांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन या संदर्भात निधी आणू असं भाषणात सांगितलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीच्या सरकारमध्ये 15 वर्षे एकत्र काम केलं आहे. मात्र दोघांच्यात राजकीय वैर होतं.

हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाला अजित पवार यांनीच खऱ्या अर्थाने सुरुंग लावला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विरोध असतानाही दत्तात्रय भरणे यांना 2009 साली बंडखोरी करण्यास भाग पाडलं. या नंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दोन वेळा विधानसभेला विजयी करण्यामध्ये अजित पवारांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

एकेकाळी आघाडी सरकार मध्ये काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते म्हणून असलेले हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा घरचा रस्ता दाखवण्यात अजित पवार यशस्वी ठरले आहेत, हर्षवर्धन पाटील यांनीदेखील मी थेट अजित पवारांचा विरोधक असल्याचा जाहीर कार्यक्रमांमधून अनेक वेळा सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील” 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…” 

Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले

…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम