दिशा सालियान प्रकरणी नारायण राणेंचा खळबळजनक दावा, म्हणाले…

मुंबई | महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून एकेकाळचे मित्र असणारे शिवसेना आणि भाजप दोन्हींमध्ये जोरदार वाद वाढला आहे. राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा प्रयोग महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला होता.

पुर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि सध्या भाजपमध्ये असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील सत्तासंघर्ष अवघ्या राज्यानं पाहीला आहे. आता हा वाद नव्या वळणावर पोहोचला आहे.

नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावल्यानंतर राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. राणेंनी पत्रकार परिषदे घेत जुनी प्रकरण बाहेर काढण्याचा इशारा ठाकरेंना दिला आहे.

आपल्या अप्रतिम अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं होतं.

नारायण राणेंनी परत एकदा सुशांत सिंह आणि दिशा सालियान प्रकरणाचा उल्लेख करत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. परिणामी राज्यात मोठा वाद उद्भवला आहे.

दिशा सालियानचा बलात्कार कोणी केला?, सुशांत सिंहच्या इमारतीतील सीसीटिव्ही फुटेज गायब करण्यात आलं होतं यामगं कोणाचा हात आहे?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

8 जूनला बलात्कार करून दिशा सालियानची हत्या करण्यात आली आणि सर्वांना सांगण्यात आलं की तिनं आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास होणार आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दिशाला पार्टीला थांबायला सांगितलं, ती थांबली नाही, तिच्यावर बलात्कार होत असताना प्रोटेक्शन कोणाचं होतं, पोलीस प्रोटेक्शन कोणाला देण्यात आलं, ती ज्या इमारतीत राहायची तेथील रेकाॅर्ड गायब झालेत, असे अनेक प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केले आहेत.

नारायण राणेंच्या आरोपांनी राज्यात खळबळ माजली आहे. दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत दोन्ही प्रकरणात राणेंनी राज्यातील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…” 

Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले

…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम