Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | सोने आणि चांदीच्या किमतींत (Gold and Silver Rate) चढ उतार सुरुच असतो. आता गणेशात्सावात आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीचा नवीन दर आला आहे.

सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rates Today) किंमती आता घसरल्या आहेत. कालच्या (31 ऑगस्ट) प्रमाणे आजच्या देखील किंमती घसरल्या आहेत.

आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,000 प्रति टोळा (10 ग्रॅम) आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्नस या वेबसाईटनुसार चांदीचे दर 20 पैशांनी पडले आहेत. 51,600 रुपये प्रति किलो दराने चांदी खरेदी केली जाऊ शकते.

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,030 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,300 रुपये असेल. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,030 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,300 रुपये इतका आहे.

नाशिकात 24 कॅरेट सोन्याचा दर 47,030 आहे आणि प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,300 रुपये आहे. चादींचा आजचा प्रति 10 ग्रॅम दर 515 रुपये आहे.

दरम्यान कटकमध्ये सोन्याचा दर 5,250 रुपये प्रति ग्रॅम आणि 5180 रुपयांच्या दरात सुरु आहे. भुवनेश्वरात चांदी 54000 हजार रुपये प्रतिकिल विकली जात आहे. विशेष म्हणजे राज्य कर उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेस यासारख्या घटकांमुळे भारताच्या सोन्याच्या किंमतीत बदल होत राहतात.

महत्वाच्या बातम्या – 

दाऊदला पकडण्यासाठी एनआयए सज्ज, केली मोठ्या बक्षिसाची घोषणा

शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्याबाबत’ नारायण राणेंचा मोठा दावा, म्हणाले…

पुण्याला कोणी वाली राहिला नाही, या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे रहाणार का? शशी थरुर म्हणाले…

“ईडीच्या भितीने राज ठाकरे भाजपसोबत जवळीक साधत आहेत, आणि…”; किशोरी पेडणेकरांची मोठी टीका