“राज्यात सत्ता आमचीच तरी नितेश राणेंसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवला”

मुंबई | शिवसैनिक संतोष परब मारहाण (Shivsainik Santosh Parab) प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांची पोलीस कोठडी संपल्याने शुक्रवारी त्यांना कणकवली न्यायालयात (Kankavali Court) हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजुंकडून झालेल्या युक्तीवादानंतर नितेश राणे यांनना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

नितेश राणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भाजप आमदार नितेश राणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावरुन शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्यात आमची सत्ता आहे. तरीदेखील आम्ही कायदा हातात न घेता नितेश राणे यांना सॉफ्ट कॉर्नर दाखवला. आम्हाला सत्तेचा गैरवापर करायचाच असता तर नितेश राणे यांना रुग्णालयात नव्हे तर तुरुंगातच ठेवलं असतं, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे.

महाविकासआघाडीला राजकीय सुडापोटी नितेश राणे यांच्यावर कारवाई करायीचच असती तर त्यांची रुग्णालयातही चौकशी केली असते. यावरुनच आम्ही सत्तेचा वापर करतो की नाही, हे समजतं. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे एखादा राजकीय नेता वळतो तेव्हा त्याच्यावर यासाठीच शिक्षा करावी लागते की, तो पुन्हा अशा घटना करणार नाही. यासाठी त्याला शिक्षा केली जाते, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

राणे-ठाकरे अशी तुलना होऊच शकत नाही. मुंबईत मराठी माणसाला कोणी न्याय दिला, मराठी माणसाला कोणी टिकवलं, महाराष्ट्राची अस्मिता ज्यांनी टिकवली त्यांना ठाकरे म्हणतात. त्यांची तुलना राणेंशी होऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.

एक जागा निवडून येणाऱ्या माणसाची ठाकरेंशी तुलना करणं चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही बंदुका घेऊन फिरत होता, खंडणी गोळा करत होता, अधिकाऱ्यांवर बांगडा फेकत होतात, तेव्हा तुमचा आणि आमचा वाद होता का? त्यामुळे तुमच्यावर कारवाई केली का, असा सवालही शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांना विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“राहुल गांधींनी तीर सोडला आणि सत्ताधारी घायाळ झाले” 

राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात बड्या अधिकाऱ्याचा सर्वात धक्कादायक खुलासा! 

मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा- अमृता फडणवीस 

टीम इंडियाचा नवा Test Captain कोण?, सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं 

“मला फक्त मुंबईत येऊ द्या, मग मी बघतो काय करायचं ते”