दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर टीका; म्हणाले, जे हिटलरने केेले…

मुंबई | शिवसेनेत बंड झाल्यापासून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. त्यांनी महाराष्ट्र दौरा करत बंडखोरांवर टीका केली आणि शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले.

गेला महिनाभर शिवसेना आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार आणि आता नवनिर्वाचीत मंत्री एकमेकांवर टीका करत आहेत. त्यांच्यात रोज शाब्दिक चकमकी होत आहेत.

आता दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर टीका केली आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने जे काही केले होते. तसेच अगदी आदित्य ठाकरे आज महाराष्ट्रात करत आहेत, असे केसरकर म्हणाले.

जर्मनीचा हुकुमशहा अ‌ॅडोल्फ हिटलर (Adolf Hitler) याने जेव्हा संपूर्ण जगाला महायुद्धाच्या दरीत ढकलले होते, तेव्हा त्याच्यासोबत गोबेल्स होते. हिटलरच्या सत्तेत गोबेल्स हे मंत्री देखील होते.

गोबेल्सची एक नीती होती. शंभर वेळा एक खोटे बोला, ते लोकांना खरे वाटायला लागेल. आज तेच काम महाराष्ट्रात आदित्य ठाकरे करत आहेत, असा गंभीर आरोप केसरकर यांनी ठाकरेंवर केला आहे.

आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाऊन लोकांसोबत खोटे बोलत आहेत. ते खोटे माहिती पसरविण्याची कामे करत आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो.

पण जर का ते गोबेल्सच्या वाटेवर जाऊ लागले तर आम्ही ते सहन करणार नाही. ही भूमी गोबेल्सच्या नीतींना मान्यता देण्याची नाही, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, असे केसरकर म्हणाले.

यावेळी त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकांवर भाष्य केले. भाजप आणि शिवसेना मिळून आम्ही महानगरपालिकेत 150 जागा जिंकू असा त्यांनी दावा केला.

महत्वाच्या बातम्या –

गोविंदांना आरक्षण देण्यावरुन तृप्ती देसाई संतापल्या आणि मुख्यंत्र्यांकडे केले मोठी मागणी

इंदुरीकर महाराजांविरोधात गावकरी आक्रमक; घेतली पोलिसांत धाव

अजित पवारांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, येवढा अकांडतांडव…

बिल्कीस बानो प्रकरणात गीतकार जावेद अख्तर आक्रमक, दिली संतप्त प्रतिक्रिया

मुंबईवर पुन्हा 26/11 चे सावट? वाचा सविस्तर वृत्त