पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती अभिनेता रणवीर सिंग देखील नेहमीच वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत असतात. बॉलिवूड मधील ही सुपर कूल जोडी एक आयडिएल कपल म्हणून ओळखली जातं.

अशातच आता दीपिकाने आपल्या पतीची तक्रार केल्याचं समोर आलं आहे. दीपिकाने बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे तक्रार रणवीरची तक्रार केली आहे. रणवीरने दिलेलं वचन पूर्ण न केल्याची तक्रार दीपिकाने केली आहे.

दीपिकाने नुकतीच ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या नव्या भागात हजेरी लावली होती. या भागात तिने अगदी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यावेळीच दीपिकाने बीग बींकडे रणवीरची तक्रार केली आहे.

रणवीरची तक्रार करताना दीपिका म्हणाली की, लग्नाअगोदर रणवीरने वचन दिलं होतं की तो मला रोज ब्रेकफास्ट बनवून देईल. परंतु आजपर्यंत रणवीरने केव्हाच मला ब्रेकफास्ट बनवून दिला नाही. दीपिकाने तक्रार केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी लगेच रणवीरला फोन केला.

यावेळी अमिताभ बच्चन रणवीरला म्हणाले की, दीपिका एवढ्या वर्षांपासून बोलत आहे तरी देखील तू जेवण बनवत नाहीस. बीग बींच्या प्रश्नावर उत्तर देताना रणवीर म्हणाला की, आता बच्चन साहेबांनी सांगितलं आहे म्हटल्यावर दीपिकाला मांडीवर बसवून आमलेट चारेल.

रणवीरच्या या उत्तरानंतर तिथे उपस्थित दिग्दर्शिका फराह खाना यांनी रणवीरची चांगलीच फिरकी घेतली. त्या रणवीरला म्हणाल्या, तूला खायला घालायला सांगितलं होतं, उचलून घ्यायला नाही. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, रणवीर आणि दीपिका हे दोघे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांसोबत बराच काळ घालवल्यानंतर या दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या नात्याला एक नवीन नाव दिलं.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी

‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात

“सिद्धार्थचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाला नाही, त्यादिवशी त्याच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या होत्या”

‘आर्यनने मुलींना डेट करावे, ड्रग्ज घ्यावेत, सेक्स करावा’; मुलाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शाहरुख पुन्हा चर्चेत

कचऱ्यावाल्यानी वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ