“सनी लिओनीचा ‘तो’ व्हिडीओ 3 दिवसात हटवा”, गृहमंत्र्यांचा अल्टीमेटम

भोपाळ | बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. आपल्या नृत्य आणि अदांनी प्रेक्षकांवर भूरळ घालणाऱ्या सनीचे अनेक चाहते आहेत.

सनी लिओनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अशातच आता सनी लिओनीचा 1960 मधील कोहिनूर चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका’ ( Madhuban mein Radhika )  गाण्‍याचा रिमेक प्रसिद्ध झाला आहे.

सनी लिओनी आणि संगीतकार शारिब तोशी यांनी या गाण्‍याचा रिमेक केलाय. मात्र हा म्युझीक व्हिडीओ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

सनी लिओनीच्या या म्यूझिक व्हिडीओमुळे हिंदू धर्मियांंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्‍य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे.

‘मधुबन मे राधिका’ या गाण्याचा व्हिडीओ तीन दिवसात हटवावा, तसेच सनी लिओनीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी  गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे.

हा व्हिडीओ हटवला नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. काही लोक सातत्‍याने हिंदू धर्मांच्‍या भावना दुखावत आहेत. हा व्‍हिडीओ ही असाच प्रकार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलंय.

भारतात राधेची पूजा केली जाते त्यामुळे  साकिब तोशी यांनी आमच्‍या धर्माच्‍या भावना दुखावल्‍या जातील अशी गाण्‍याची निर्मिती करु नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, 22 डिसेंबरला हा व्हिडीओ रिलीज झाला आहे. फक्त 4 दिवसात या व्हिडीओला 9 कोटीहून अधिक लोकांनी पाहिलं देखील आहे. मथुरेतील काही पुजाऱ्यांनी देखील या गाण्यावर आक्षेप घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अभिमानास्पद! युवराज सिंगची ‘ती’ खास बॅट अंतराळात पोहोचली; पाहा व्हिडीओ

अजित पवार म्हणतात, “तो राज्यपालांचा अधिकार पण ज्या परंपरा…”

फुटबाॅलच्या मैदानात दुर्दैवी घटना; खेळाडू गोलकिपरला धडकला अन्…; पाहा व्हिडीओ

“वडिलांनी सांगितलंच होतं, आज काहीतरी वाईट होणार”, जग्गूदादाचा मोठा खुलासा

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; तब्बल 33 जणांना कोरोनाची लागण