…त्याच आमदारांना मुंबईत घरं मिळणार- अजित पवार

मुंबई | आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं अशी मागणी शिवसेना आमदारांनी (Shivsena MLA) केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आमदारांसाठी आता 300 घरं बांधणार असल्याची घोषणा केली होती.

महाविकास आघाडीचं सरकार केवळ बोलणार नाही तर करुन दाखवणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सर्वस्तरातून टीका झाली. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आमदारांच्या घरांच्या घोषणेबाबत गैरसमज झाला. ती घरं मोफत दिली जाणार नाहीत. ज्या आमदारांची मुंबईत घरं नाहीत, त्याच आमदारांना या योजनेचा लाभ होणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं.

या योजनेबाबत कारण नसताना गैरसमज होत असतील, तर तो निर्णय थांबवलाही जातो. कदाचित तसाही विचार केला जाईल, असंही अजित पवार म्हणाले.

त्या घोषणेबाबत चुकीचा मेसेज गेला. ती घरं मोफत दिली जाणार नाहीत. जसं म्हाडाकडून वेगवेगळ्या कोट्यातील लोकांना घरं दिली जातात. त्यातूनच आमदारांना घरं दिली जाणार आहेत. ज्या आमदारांची मुंबईत घरं नाहीत, त्याच आमदारांना या योजनेचा लाभ होणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय! 

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

‘काहीही खाऊ नका, पिऊ नका’; झेलेंस्की यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना