डोळ्याखाली दुखापत होऊनही विराट खेळत राहिला! पाहा काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण

चेन्नई| आयपीएलच्या चौदाव्या पर्वाची सुरुवात रोमहर्षक पद्धतीने झाली आहे. सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला गेला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही  मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली आहे. आरसीबीच्या संघाने यावेळी दमदार कामगिरी करत विजयी सलामी दिली. 2021 हंगामाच्या सलामीच्या लढतीत शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 विकेट्सने विजय मिळवला.

या मोठ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून ख्रिस लिनने सर्वाधिक 49 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सच्या या डावातील 19 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का बसला असता.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली. कृणाल पंड्याचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. विशेष म्हणजे दुखापतीनंतरही विराट मैदानात खेळत राहिला.

19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडुवर कृणाल पंड्या चेंडू तटावला. त्याचा झेल पकडताना विराटला अंदाज आला नाही आणि थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळला. हा चेंडू डोळ्याच्या खाली लागल्याने पूर्ण डोळा सुजला.

कोहलीने या दुखापतीची तमा न बाळगता मैदानात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेदना थांबवण्यासाठी तो डोळ्याखाली बर्फ लावताना मैदानात दिसत होता. त्याच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. कर्णधाराला शोभेल असा वागलास अशा कमेंट्स देत आहेत.

विराटनं आपले स्थान बदलले आणि ज्या ठिकाणी त्याचा फटका बसला त्या आजूबाजूला तो आईसपॅक वापरताना दिसला. आरसीबीचा कर्णधार फिल्डिंग चालू ठेवत असतानाही कोहलीच्या उजव्या डोळ्याखाली व्हिज्युअल्सने जखम दाखविली.

दरम्यान, बंगळुरुकडून एबी डीव्हीलियर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जाॅनसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी बंगळुरूकडून जलदगती गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला होता. या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

IPL 2021: यावर्षीही मुंबईची पहिली मॅच देवाला, रोमांचक…

रुपयात घसरण झाली अन् सोन्याचे दर वधारले, वाचा आजचे दर

चक्क रस्त्यावर रंगली WWE! चिमुरड्यांच्या हाणामरीचा हा व्हिडीओ नक्की बघा, तुम्हीही पोट धरून हसाल

संतापलेल्या द्रविडचा अवतार पाहून विराटही हैराण, गाडीच्या काचा फोडल्या अन्…; पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं कौटुंबिक वादातून केला आत्महत्येचा प्रयत्न