नवी दिल्ली | सर्वच राजकीय पक्षांचे विधासनसभा निवडणुकीच्या तारखांकडे डोळे लागले होते. तर आचारसंहितेच्या धसक्याने मंत्रालयापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्णयांचा धडका लवला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका लावला. मागील चार दिवसांमध्ये अनुदान, निधी वाटप, बदल्या, नियुक्त्या, बढत्या आणि पदोन्नतीसंदर्भातील एकूण 471 निर्णय घेण्यात आले आहेत.
निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याच्या शक्यतेने गेल्या महिनाभरात झालेल्या मंत्रिमंडळांच्या चार बैठकांत जवळपास 100 निर्णय घेण्यात आले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामे आटोपण्यासाठी सर्वच विभागांत धावपळ उडाली असून मंत्रालयात सामान्य जनतेबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी वाढली.
महिला आयोगातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, शाळांना अनुदान, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, महामंडळांवरील सदस्यांच्या नियुक्त्या, पदोन्नती यांसारखे निर्णय मागील दोन-तीन दिवसांत घेण्यात आले आहेत.
17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान मंत्रालयापासून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये घेण्यात आलेले 471 निर्णय तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणुकीची तारीख ठरली… मतदानाची आणि निकालाचीही! https://t.co/iQEY1mO3X2 #विधानसभा2019 #महाराष्ट्र
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
“नाथाभाऊ पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत ही माझी इच्छा आहे” https://t.co/8rHHurfcPl @Pankajamunde @EknathKhadseBJP
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
सरकारला चिमटा काढणाऱ्या व्यंगचित्रावर संजय राऊत म्हणतात, ‘व्वा क्या बात है!’ https://t.co/scEdIVZMeI @rautsanjay61 @ShivsenaComms @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019