विधानसभा निवडणुकीची तारीख ठरली…मतदानाची आणि निकालाचीही!

नवी दिल्ली | निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद परिषद आज दिल्लीत पार पडली. महाराष्ट्र हरियाणा राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रची निवडणूक 21 ऑक्टोबरला होईल, अशी माहिती केंद्रीय आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली आहे.

आजपासून महाराष्ट्र आणि हरियाणात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान आणि 24 ऑक्टोबरला निकाल लागणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

एका उमेदवाराला खर्चाची मर्यादा 28 लाखांची आहे. त्याहून जास्त खर्च उमेदवाराला करता येणार नाही.

अर्ज भरण्याची तारीख 27 सप्टेंबर पासून शेवटची तारीख 4 ऑक्टोबर असणार आहे. छानणी 5 ऑक्टोबरला होईल तर अर्ज  मागे घेण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर आहे.

दिवाळीच्या आधीच महाराष्ट्रात नवं सरकार कोणाचं येणार हे ही आज स्पष्ट झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या-