“मुख्यमंत्री वेळच देत नाहीत, आमचा एकच आधार ते म्हणजे अजित पवार”

मुंबई | राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ पाहायला मिळत आहे. त्यात अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचता येत नसल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

राज्यसभा निवडणुकीदरम्यान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली असल्याचा आरोप करण्यात आला. यांनंतर भुयार यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेतील काही नेत्यांविरोधात नाराजीचा सूर आवळला आहे.

देवेंद्र भुयार यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अपक्ष आमदारांना सरकारच्या लेखी फक्त निवडणुकीपुरते स्थान असते. नंतर त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, अशी खंत भुयार यांनी बोलून दाखवली.

भुयार यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना अपक्ष आमदारांना फक्त एकच आधार असल्याचं म्हटलं आहे. आम्हाला केवळ एकच आधार आहे, तो म्हणजे मंत्रालयाचा सहावा माळा, अजित पवार, असं भुयार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे भेटीसाठी वेळ देत नाही. अपक्ष आमदार व मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप करताना संजय राऊतांनी देखील ही बाब कबूल केल्याचं भुयार म्हणाले आहेत.

शिवसेनेतील काही नेते आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे पोहचू देत नसल्याचा गौप्यस्फोट देखील देवेंद्र भुयार यांनी केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी हे झारीतील शुक्राचार्य ओळखले पाहिजेत, असा सल्लाही भुयार यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री ठाकरेंपर्यंत पोहोचता येत नाही. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्याही आमदाराचे प्रश्न सोडवतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात, असं वक्तव्यही भुयार यांनी केलं आहे.

दरम्यान, अजित पवारांना भेटीसाठी पहाटे 5 वाजचा फोन केला आणि त्यांनी लगेच 7.45ची वेळ दिली. मात्र, मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही, असं म्हणत भुयार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘अजितदादा परत आमच्यासोबत या’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

“उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

मोठी बातमी! ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज घेताना अटक

तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय ‘इतक्या’ जागा भरणार

“हातात ईडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते, तुम्हाला तर…”