सदाभाऊ खोत यांच्याकडून अखेरच्या क्षणी माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?

मुंबई | राज्यसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वीच चुरस पाहायला मिळत असताना सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे.

सदाभाऊ खोत यांनी विधानसभेसाठी भाजप पुरस्कृत म्हणून अपक्ष अर्ज भरला होता. खोत यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सदाभाऊ खोत यांनी माघार घेतल्यावर भाजपकडून 5 तर महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपकडून प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड, राम शिंदे व उमा खापरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेचे सचिन अहीर, आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे व रामराजे निंबाळकर तर काँग्रेसचे भाई जगताप व चंद्रकांत हंडोरे रणांगणात आहेत.

दोन्ही बाजूने पाच पाच उमेदवार लढले तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते. सदाभाऊ खोत यांनी माघार घेतल्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी आपला डमी अर्ज मागे घेतला. तसेच काँग्रेसही आपला दुसरा उमेदवार मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचा दुसरा उमेदवार माघार घेत नसल्याने ही निवडणुक होत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे जर काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घेतला तरच विधान परिषद निवडणुका बिनविरोध होऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री वेळच देत नाहीत, आमचा एकच आधार ते म्हणजे अजित पवार”

‘अजितदादा परत आमच्यासोबत या’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

“उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

मोठी बातमी! ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज घेताना अटक

तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय ‘इतक्या’ जागा भरणार