“महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय”

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde in surat) यांनी जवळपास 29 आमदारांना घेऊन गुजरात गाठलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. आघाडी सरकार पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या सर्व चर्चांवर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया दिलीये.

एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. ते काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटत नाही असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे हे अतिशय प्रामाणिक, सर्वाधिक काम करणारे मंत्री आहेत. ते काही काही चुकीचं करतील अस वाटत नसल्याचं भुयार यांनी सांगितलं.

सरकारला कुठलाही धोका नाही, कारण या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे असं म्हणत भुयार यांनी सरकारला धोका असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.

दरम्यान, गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Eknath Shinde | भाजपने एकनाथ शिंदेंना दिली ‘ही’ मोठी ऑफर? 

शिवसेनापाठोपाठ काँग्रेसमध्येही भूकंप होण्याची शक्यता! 

“संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा….”; शिवसेना नेत्याने सांगितलं नेमकं काय झालं? 

मोठी बातमी! 11 आमदारांसह नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे अखेर गुजरातमध्ये सापडले 

“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”