ज्यासाठी अर्थसंकल्प मांडतात तेच नव्हतं; अजित पवारांनी मांडलेल्या बजेटवर फडणवीसांची टीका

मुंबई |  अजित पवारांचं बजेट नाही तर जाहीर सभेमधील भाषण होतं. त्यांनी अर्थसंकल्पात फक्त भाषण दिलं. आकडे कुठेच दिसले नाहीत. ज्यासाठी अर्थसंकल्प मांडतात तेच नव्हतं. अर्थसंकल्पात फक्त भाषणबाजी करण्यात आली, अशी घणाघाती टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. ज्यावर आर्थिक स्थितीबाबत कोणतंही विश्लेषण नव्हतं. ज्यासाठी अर्थसंकल्प मांडतात तेच नव्हतं, असं म्हणत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं.

प्रचंड मोठी आर्थिक तूट आहे, ती यावर्षी आणखी वाढणार आहे. त्याबाबत काहीच उल्लेख नाही. अर्थसंकल्पात बॅलन्स पाहायला मिळाला नाही, असं फडणवीस म्हणाले.

अजित पवारांना आणि या सरकारला या राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ देखील आहे, याचा सरळसरळ विसर पडला आहे. कोकणाचं फक्त नाव घेऊन कोकणाच्या तोंडाला देखील त्यांनी पानं पुसली आहे, असं फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर मला आनंद झाला असता; अर्थसंकल्पावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

-मराठा समाजासाठी अजित पवारांची मोठी घोषणा!

-पुण्याचा ट्राफिक प्रश्न सोडवण्यासाठी गडकरी अन् अजित पवारांची युती…!

-अजित पवारांचं बजेट नाही तर जाहीर सभेतील भाषण; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

-अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर पेट्रोल डिझेल महागणार!