अजित पवारांच्या अर्थसंकल्पात ही महत्त्वाची घोषणा; मनसेकडून जोरदार स्वागत

मुंबई |  अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची महत्तपूर्ण घोषणा केली. या घोषणेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केलं आहे.

वाशीच्या प्रस्तावित महाराष्ट्र भवनच्या जागेवर मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी मनसैनिकांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत आपला आनंद साजरा केला.

इतर सर्व राज्याची वाशी इथे भवन असताना महाराष्ट्र भवन का साकारलं जात नाही? असा प्रश्न मनसेकडून उपस्थित केला जात होता. गेली अनेक वर्ष मनसे याचा पाठपुरावा करत होती. तसंच यासाठी आंदोलनंही केली जात होती.

दरम्यान, अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र भवनाची घोषणा केल्याने मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ज्यासाठी अर्थसंकल्प मांडतात तेच नव्हतं; अजित पवारांनी मांडलेल्या बजेटवर फडणवीसांची टीका

-…तर मला आनंद झाला असता; अर्थसंकल्पावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

-मराठा समाजासाठी अजित पवारांची मोठी घोषणा!

-पुण्याचा ट्राफिक प्रश्न सोडवण्यासाठी गडकरी अन् अजित पवारांची युती…!

-अजित पवारांचं बजेट नाही तर जाहीर सभेतील भाषण; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका