सरकारचा रिमोट पवारांकडे तर रिमोटची बॅटरी सोनिया गांधींकडे; फडणवीसांची टीका

नागपूर |  उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा रिमोल कंट्रोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आहे तर त्या रिमोटची बॅटरी दिल्लीत सोनिया गांधी यांच्याकडे आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरमध्ये कार्यकर्ता मेळ्व्यात ते बोलत होते.

काही लोकांनी विश्वासघात करुन सत्ता स्थापन केली आहे. आता या लोकांना सत्तेची गुर्मी चढली आहे. हिंमत असेल तर सुधारित नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन करून दाखवा, सावरकरांच्या मुद्द्यांवर भूमिका घ्या, असं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलं आहे.

एकतर हे सरकार विश्वासघात करून सत्तेत आलं आहे. दुसरीकडे हे सरकार कामं थांबवत आहे. कामं थांबवणारं सरकार जास्त टिकत नाही, अशी टीका देखील त्यांनी सेनेवर केली.

गेली अनेक वर्ष नागपूर जिल्हा भाजपचा गड म्हणून पाहिला जातो. जिल्ह्यात आपल्याला यश कमी आलं असेल, पण त्याची कारणं वेगळी आहेत. एखाद्या निवडणुकीने आमच्या ताकदीचं मूल्यमापन होऊ शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर; 100 जीबी डाटा मिळणार मोफत

-गुरूला पद्मश्री मिळाल्याने शिष्याचा आनंद द्विगुणीत! म्हणतो….

-पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे- नितीन गडकरी

-गेले 13 वर्ष लतादिदी मला ‘पद्मश्री’ मिळावा म्हणून प्रयत्न करत होत्या- सुरेश वाडकर

-पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; उद्धव ठाकरे कारवाई करणार का??