पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीला जायला तयार- देवेंद्र फडणवीस

धुळे | मी काही काळ राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. न्यूज18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. ‘आज का देवेंद्र कल का नरेंद्र’ भाजपच्या असा विश्वास कायमच भाजपच्या गोटात दाखवला जातो याला खुद्द मुख्यमंत्र्यांनीच साला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलंय.

‘राज्यात देवेंद्र आणि दिल्लीत नरेंद्र’ अशी घोषणा राज्यात कायम दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आपलं स्थान मजबूत केलंय, असं मानलं जातं.

राज्या ज्या मोजक्या मुख्यमंत्र्यांना सलग पाच वर्ष पूर्ण करायला मिळाली अशा मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. मुख्यमंत्र्यांनी ही गुगली टाकत सगळ्यांनाच धक्का दिला. 

आमची परीक्षक जनता आहे. महाजनादेशाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आम्ही अपेक्षा पूर्ण करु याचा लोकांना विश्वास वाटतो. त्यामुळे भाजपच पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आमच्या यात्रेनंतर इतर पक्षांनी यात्रा काढावी वाटली. विरोधकांच्या यात्रांना प्रतिसाद नाही, असंही ते या मुलाखती दरम्यान म्हणाले.   

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय. त्यावर बोलताना उदयनराजेे पक्षात आले तर आनंद, आम्ही त्यांचे स्वागत करु, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या-

-मराठीत फलक दिसला पाहिजे….; राज ठाकरे यांची ईडीला नोटीस

-सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे- उद्धव ठाकरे

-मुख्यमंत्री एमबीए आहेत, याचा अर्थ असा की…; अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

-संंजय बांगर यांना हटवून भारतीय फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी ‘यांची’ निवड

-समाजकंटकांना पोलीस ठोकणार की मी ठोकू???- नितीन नांदगावकर